माय नगर वेब टीम
अहमदनगर - नगर शहराने रंगभूमीला अनेक दिग्गज कलाकार दिले आहेत. कलाकार घडण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. नगर जल्लोष संस्था सांस्कृतिक वारसा जपत काम असल्याने नगरच्या सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य महत्वाचे व बहुमोल योगदान देणारे आहे. नगर शहरा बद्दल अभिमान बाळगून शहराचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्याच्या या उपक्रमात सर्व नागरकारांनी सहभागी व्हावे व या युवकांना पाठबळ द्यावे, असे प्रतिपादन माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी केले.
येत्या 28 तारखेला साजरा होणाऱ्या नगर शहराचा ५२९ व्या स्थापना दिनानिमित्त सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या दहा वर्षांपासून योगदान देणाऱ्या नगर जल्लोष ट्रस्टच्या वतीने ‘नगर जल्लोष 2019’ या नृत्य, गायन, वादन व मिमिक्री चा संयोग असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचेआयोजन करण्यत आले आहे. मंगळवार दि.२८ मे ला सावेडी येथील जाँगिग ट्रॅकवर सायंकाळी ६.00 वा. हा सांस्कृतिक
कार्यक्रम होणार आहे. या सांस्कृतिक सोहळ्या साठी जॉगिंग ट्रॅकच्या मैदानावर भव्य स्टेज उभारण्यात येणार असून या स्टेजच्या कामाचा शुभारंभ माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी व धनंजय जाधव यांच्या हस्ते झाले. तसेच कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसिद्धी साठी तयार करण्यात आलेल्या डिजिटल स्क्रीन गाडीचे उदघाटन प्रायोजक शेखर कोडम व श्री. मेहेर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी जल्लोष अध्यक्ष सागर बोगा, उपाध्यक्ष रत्नाकर श्रीपती, युवा मोर्चाचे चिटणीस महेश सब्बन, अक्षय आंबेकर, अजय म्याना, शुभम बुरा, दीपक गुंडू, विजय जुंदरे, जयेश हजारे, सचिन बोगा, महेश बल्ला, रोहित लाहोर, अक्षय मंचे, विशाल गाजुल, गणेश साळी, सुनील मानकर, राहुल आडेप आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना धनंजय जाधव म्हणाले, आपल्या नगर शहराच्या स्थापना दीना निमित्त राबवला जाणारा हा सर्वात अनोखा उपक्रम आहे. नगर जल्लोष ट्रस्ट चे सर्व युवक मोठ्या उत्साहात का सांस्कृतिक सोहळ्या चे आयोजन करून नगरकारांना अनोखी मेजवानी देत आहेत. नगर जल्लोशच्या अशा चांगल्या सामाजिक उपक्रमाना सर्वतोपरी सहकार्य करू.
प्रास्ताविकात अध्यक्ष सागर बागा म्हणाले, नगर जल्लोष ट्रस्टच्या वतीने गेल्या 8 वर्षी पासून या सांस्कृतिक कार्यक्रम चे आयोजन करून शहराचा स्थापणादिन साजरा करण्यात येत आहे. यावर्षीच्या कार्यक्रमात
अनेक महान कलाकार या व्यसपिठावर आपली कला सादर कारणार आहेत. नगरमधील अनेक दानशूरांचे सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमात सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रतिल बहुमोल योगदान दिल्या बद्दल उद्दोजक नरेंद्र फिरोदिया यांना ‘नगर भूषण’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहोत. नगरमधील सर्व नागरिकांनी या सोहळ्यास उपस्थिती लावावी असे आवाहन केले आहे

Post a Comment