माय नगर वेब टीम
नवी दिल्ली -लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेने केवळ ५२ जागांवर समाधान मानावे लागणाऱ्या काँग्रेसची कार्यकारिणी समितीची बैठक सुरु आहे. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला राजीनामा सादर केला आहे.
लोकसभा निवडणुकीत ५४२ पैकी काँग्रेसला केवळ ५२ जागा मिळाल्या आहेत. राहुल गांधी यांनी वायनाडमधून दणदणीत विजय मिळवला असला तरीही परंपरागत अमेठी मतदारसंघ त्यांना राखता आला नाही. तर १९ राज्यांमध्ये काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. पक्षाध्यक्ष या नात्याने राहुल यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा सादर केला आहे. परंतु, समितीने तो स्वीकारला नाही. दरम्यान, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे देखील राजीनामा देणार असल्याचे समजते.

Post a Comment