‘श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी; लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद कहाणी!!’ - सुप्रिया सुळे


माय नगर वेब टीम
पुणे –
भारतीय जनता पक्षाने प्रतिष्ठेच्या केलेल्या लढाईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभेचा गड सलग तिसऱ्यांदा राखला. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार कांचन कुल यांचा दीड लाखांहून अधिक मताधिक्य घेत पराभव केला. सुळे यांना नेहमीप्रमाणे बारामती विधानसभेतून सर्वाधिक मतदान झाले. त्यापाठोपाठ दौंड, पुरंदर आणि भोर विधानसभा मतदार संघांतूनही त्यांनी मोठय़ा प्रमाणावर मते मिळविली. या विजयानंतर सुळे यांनी आपल्या वडिलांसाठी म्हणजेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासाठी फेसबुकवर एक खास पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी माझ्यासाठी माझे वडीलच आदर्श असल्याचा संदेश देत निवडणुकीनंतर आपल्या वडिलांचे आगळ्या वेगळ्या पद्धतीने आभार मानले आहेत.

लोकसभा निवडणुकीतील विजयाची हॅट्ट्रिक साधल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर, इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ‘श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी; लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद कहाणी!!’ या ओळी त्यांनी ट्वीट केल्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी कवितेतून शरद पवारांना ‘सलामी’ दिली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post