माय नगर टीम
नगरमधील केंद्रीय विद्यालय क्र. १ मध्ये नुकत्याच पार पडलेल्या मुंबई विभागीय क्रीडा स्पर्धेत तायक्वांदो क्रीडा प्रकारात प्रिती शरद मगर हिने १७ वर्षाखालील ३५ ते ३८ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदक पटकावले आहे.
प्रिती हिची दि.१४ ते १८ मे दरम्यान उत्तर प्रदेशातील मथुरा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.तिच्या या यशाबद्दल तिचे आ.अरुण जगताप, आ.संग्राम जगताप, नगरसेवक संपत बारस्कर, नगरसेविका दिपाली बारस्कर, मीनाताई चव्हाण, डॉ.सागर बोरुडे, बाळासाहेब बारस्कर,सतीश बारस्कर, योगेश ठुबे आदींनी अभिनंदन केले.

Post a Comment