माय नगर टीम
गोरगरिबांच्या सेवेतून पुण्य मिळविण्याचे काम होत असते. आ.शिवाजीराव कर्डिले यांनी नेहमीच आपल्या पदाचा उपयोग हा सर्व सामान्य जनतेसाठी केला आहे.जनतेच्या सुखदुखात सहभागी सहभागी होणारा आमदार म्हणून त्यांची राज्यभर ख्याती आहे.आपला मुलगा अक्षय याचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करत दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्याचा त्यांचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन हभप आदिनाथ शास्त्री महाराज यांनी केले.
युवा नेते अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळामुळे नगर तालुक्यात सुरु करण्यात आलेल्या जनावरांच्या चारा छावण्यासाठी १२५ पाण्याच्या टाक्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी हभप आदिनाथ शास्त्री महाराज बोलत होते. व्यासपीठावर आ.अरुण जगताप, आ.शिवाजीराव कर्डिले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, नामदेव राऊत, जयदत्त धस, चंद्रकांत गाडे, रावसाहेब तनपुरे, विक्रम तांबे, सुरसिंग पवार, मिर्झा मणियार, नगरसेवक कुमार वाकळे, विनीत पाऊलबुद्धे, स्वप्नील शिंदे, प्रकाश भागानगरे, बाळासाहेब पवार, दादाभाऊ चितळकर, अमोल भनगडे, बाजार समिती सभापती विलास शिंदे, संदीप कर्डिले, हरिभाऊ कर्डिले, दिलीप भालसिंग, संतोष म्हस्के, विष्णुपंत अकोलकर, बाबासाहेब खर्से, रेवण चोभे, दादा दरेकर, संजय सपकाळ, संजय चोपडा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. कर्डिले म्हणाले, मी कधीही माझा वाढदिवस साजरा केला नाही,कारण खरी जन्म तारीख माहित नाही. पूर्वी शाळेत प्रवेश द्यायच्यावेळी सर्रास १ जून ही जन्म तारीख टाकली जायची. त्यामुळे आपण कधी वाढदिवसाच्या भानगडीत पडलो नाही. अक्षयला राजकारणात आणण्याची चर्चा सुरु झाली असेल पण एखाद्याचा बाप आमदार असला म्हणजे मुलगाही आमदार होईल असे समजणे चुकीचे आहे. त्यासाठी स्वताचे कर्तुत्व सिद्ध करावे लागते. जो समाजासाठी काहीतरी करतो त्यालाच समाज स्वीकारत असतो.
गेल्या ५ वर्षांपासून अक्षयचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जात आहे. यावर्षी जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. दुष्काळी उपाययोजनांसाठी शासन मदत करत आहे. प्रत्येकानेही यात हातभार लावणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.
मंगलदास बांदल म्हणाले, आ. कर्डिले हे दूरदृष्टी असणारे नेते आहेत, ते नेहमीच पक्ष विरहित राजकारण करीत प्रत्येकाच्या मदतीला धावून जात असतात.
अक्षय कर्डिले म्हणाले, समाजाची सेवा करण्याची शिकवण आमच्या घरातून मिळालेली आहे. वडिलांचे राजकारण आणि समाजकारणातील कष्ट पाहून आपणही त्यांच्या सामाजिक कार्यात हातभार लावावा असे वाटते, त्यामुळेच वडिलांप्रमाणेच आपण समाजात काम करणार आहोत.त्यामुळेच दरवर्षी वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. हे काम यापुढेही असेच सुरु ठेवणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी नगर, राहुरी, पाथर्डी तालुक्यातील चारा छावण्यासाठी पाण्याच्या टाक्यांचे वाटप करण्यात आले.
Post a Comment