तारीख ठरली... मैं नरेंद्र दामोदरदास मोदी शपथ लेता हूँ…




माय नगर वेब टीम

नवी दिल्ली - प्रचंड बहुमतांनी सत्तेत आल्यानंतर मोदींच्या शपथविधीकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले आहे. नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. 30 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता त्यांचा शपखविधीचा कार्यक्रम राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे.

नरेंद्र मोदींसोबत त्यांच्या नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधीचाही याच ठिकाणी पार पडेल. त्यांच्या नव्या मंत्रीमंडळात कोणा-कोणाला स्थान मिळणार याकडेही सगळ्याचे लक्ष लागले आहे.

मोदींचे नवे मंत्रीमंडळ कसे असणार याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. ज्येष्ठ नेते अरूण जेटली आणि सुषमा स्वराज यांच्या तब्येतीच्या तक्रारी आहेत. अशा परिस्थितीत त्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. आणि जर मिळालं तर कोणतं खातं मिळणार यावरूनही अंदाज बांधले जात आहेत.

मोदींच्या मंत्रीमंडळात कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post