
माय नगर वेब टीम
संगमनेर - राधाकृष्ण विखे पाटील जो निर्णय घेतील तो आम्हला मान्य असेल, त्या निर्णया सोबत जाण्याचा निर्णय आम्ही सर्वनी घेतला आहे. १ जूनला राधाकृष्ण विखे पाटील हे मंत्री पदाची शपथ घेणार असल्याचा गौप्यस्फोट आमदार अब्दुल सत्तार यांनी संगमनेर मध्ये केला.
शनिवारी(दि.२५) सत्तार हे संगमनेर येथे खाजगी कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी राधाकृष्ण विखे देखील त्याच्या सोबत होते. विखे पाटील हे लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीयवर्तुळात जोरदार सुरू आहे. त्यातच शनिवारी लोणी येथे विखे समर्थक आमदाराची गुप्त बैठक पार पडली. या बैठकीला विखे पाटील यांच्या सोबत अब्दुल सत्तार यांच्यसह किती आमदार भाजपात जाणार याकडे सर्वचे लक्ष लागले आहे.
Post a Comment