
माय नगर वेब टीम
अहमदनगर - माझा हट्ट पुरवण्यासाठी नगरकर खंबीर आहे, मला दुसऱ्या आजोबांची गरज नाही, असे नगर दक्षिणचे नवनिर्वाचित खासदार डॉ. सुजय विखे यांनी म्हटले आहे.
नगर दक्षिणमध्ये विजय संपादन केल्यानंतर सुजय विखे बोलत होते. त्यांनी शरद पवारांना यावेळी शाब्दिक टोला लगावला.
सुजय विखे यांच्यासाठी नगरची जागा सोडण्यास शरद पवार यांनी नकार दिला होता.
माझ्या नातवांचे हट्ट पुरवण्याचा माझा अधिकार आहे. पण दुसर्यांच्या नातवांचे हट्ट मी का पुरवू ? त्यांचे हट्ट मी पुरवले तर त्यांच्या आई-बाबांना काय वाटेल? असे शरद पवार म्हणाले होते.
Post a Comment