तीन महिन्यापासून प्राथमिक शिक्षक पगारापासून वंचित
माय नगर वेब टीम
अहमदनगर- सातव्या वेतन आयोगाच्या नावाखाली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना मार्च महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. शिक्षकांनी विविध प्रकारचे कर्ज घेतलेले असतात ते योग्य मुदतीत परत न केल्याने या कर्जावर विविध प्रकारची दंड रक्कम आकारली जाते असून या रकमेचा भुर्दंड शिक्षकांना सोसावा लागत आहे. तसेच शिक्षकांवर उपासमारीची व आर्थिक कुचंबणेची वेळ आलेली असून लवकरात लवकर शिक्षकांचे पगार द्यावे याबाबत शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
मार्च महिन्याचे पगार बिल चार दिवसापूर्वी पास झालेले असून ट्रेझरी तून 13 मे रोजी सीएमपी द्वारे निधी जिल्हा परिषद प्रशासनाकडे वर्ग केलेला आहे. परंतु अद्याप पावेतो जिल्हा परिषदेने शिक्षकांच्या पगाराचा धनादेश बँकेत जमा केलेला नाही.
जिल्ह्यातील अंदाजे 11 हजार शिक्षक या पगाराच्या समस्येने ग्रस्त आहेत.

Post a Comment