मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण; 862 अधिकारी, कर्मचार्यांकडून 84 टेबलवर होणार मतमोजणी
माय नगर वेब टीम
अहमदनगर- लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. त्यासाठी नगर व शिर्डी या दोन्ही मतदारसंघांच्या मतमोजणीची तयारी करण्यासाठी निवडणूक अधिकार्यांची धावपळ सुरु आहे. मतमोजणीसाठी दोन्ही मतदारसंघांत अनुक्रमे 84 टेबल ठेवण्यात येणार असून, या 168 टेबलांवर 22 लााख 13 हजार 982 मतांची मोजणी केली जाणार आहे. या मतमोजणीसाठी 862 अधिकारी व कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचार्यांचे द्वितीय प्रशिक्षण 19 मे रोजी दिले जाणार आहे.

Post a Comment