सर्जेपुरात दोन गटात राडा ; दोन जखमी



माय नगर वेब टीम

सर्जेपुरा चौकात किरकोळ कारणावरून दोन गटात सायंकाळी सात वाजता तुफान राडा झाला. या गटातील मारामारीचे कारण किरकोळ असल्याचे समोर येत आहे. दरम्यान पोलिसांनी या दगडफेकीत गंभीर दखल घेत सर्जेपुरा चौकात मोठा पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. या दगडफेकीत काही जण जखमी झाले असल्याचे समजते

अतिरीक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील, शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त लावला आहे. दरम्यान पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली असून दगडफेक करणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रीकरणही तपासले जात आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post