नगरमध्ये रामपूरवाला कार्पेट दुकानाला आग; लाखोंचा माल जळून खाक
माय नगर वेब टीम
अहमदनगर: पारशा खुंट येथे रामपुरवाला कार्पेट दुकानाला आज सकाळी साडे आठच्या सुमारास आग लागली. या आगीत दुकानातील लाखो रुपयांचा माल जळून खाक
झाला. ही आग नेमकी कशामुळे लागली हे कळू शकले नाही. परंतु शॉक सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. महापालिकेच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.
रामपुरवाला दुकानांमध्ये कापसाच्या गाड्या कार्पेट असल्याने आग तिथेच धुमसत राहिली. त्यामुळे दुकानांमध्ये धूर मोठ्या प्रमाणात साचला होता. दरम्यान रस्त्यावरील अतिक्रमणामुळे
अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचण्यास अडथळे निर्माण झाले. सकाळची वेळ असल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी आणि काही वाहने होते. त्यामुळे ती हटवून अग्निशमन बंब घटनास्थळी चालकाने कसरत करत पोहोचविला. अग्निशमन दलाचे चालक अशोक पठारे, फायरमन आरिफ इनामदार व शिवाजी कदम या तिघांनी आग आटोक्यात आणली.

Post a Comment