विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीला शरद पवारांची दांडी
माय नगर वेब टीम
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आल्यानंतर महाआघाडीतील मित्रपक्ष कामाला लागले. २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज दिल्लीच्या कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये दुपारी १.३० वाजता विरोधकांची बैठक होती. या बैठकीला २१ विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार होते. मात्र, या बैठकीतून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माघार घेतली. दरम्यान 23 तारखेला होणाऱ्या मतमोजणिकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागून आहे.
तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामींनीही या बैठकीला दांडी मारण्याचे ठरवले. बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार यांच्याऐवजी प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बसप अध्यक्ष मायावती, सपचे नेते अखिलेश यादव यांनी यापूर्वीच बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्याऐवजी त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले.

Post a Comment