राज ठाकरे फॅक्टर फेल!




माय नगर वेब टीम

मुंबई: भाजप-शिवसेनेने महाराष्ट्रात ४३ जागांवर आघाडी घेतल्यानं लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फॅक्टर चालला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. राज ठाकरे यांनी सभा घेतलेल्या दहापैकी ८ जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. त्यामुळे राज यांच्या सभांना गर्दी करणाऱ्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान केलं नसल्याचं अधोरेखित झालं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काळात राज ठाकरे यांनी नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, पुणे, महाड (रायगड), मुंबईत काळाचौकी, भांडूप, कामोठे (पनवेल) आणि नाशिकमध्ये सभा घेतली होती. मात्र त्यापैकी नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, नाशिक, काळाचौकी, भांडूप आणि कामोठे (पनवेल) आदी मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पिछाडीवर असून भाजप-शिवसेनेने या मतदारसंघात आघाडी घेतली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post