माय नगर वेब टीम
अहमदनगर
लोकसभा निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी सुरू झाली आहे.अद्याप काहीही निकाल हाती आलेला नाही. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील डॉक्टर सुजय विखे विरुद्ध आमदार संग्राम जगताप यांच्यातील लढतीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस कडूनही विजयाचा दावा केला जात आहे. भारतीय जनता पार्टीने मात्र विजयाचा दावा करतानाच मतमोजणीच्या पूर्वसंध्येला जल्लोषाची तयारी केली आहे. शहरातील गांधी मैदान येथील भाजप कार्यालयावर आकर्षक रोषणाई करून शामियाना उभारण्यात आला आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या समर्थकांची धकधक वाढली आहे.


Post a Comment