'पृथ्वी ऍग्रो' वर गुन्हा दाखल : कृषी सेवा केंद्र चालकांची पळापळ


माय नगर वेब टीम

अहमदनगर

18 लाख 88 हजार रुपयांची मुदातबाह्य कीटकनाशके सापडल्या प्रकरणी मार्केट कमिटीतील पृथ्वी ऍग्रो सर्व्हिसेसचे छबुराव किसनराव हराळ यांच्या विरोधात फसवणूकीसह विविध कलमा नुसार कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पृथ्वी ऍग्रो वर गुन्हा दाखल झाल्याने कृषी सेवा केंद्र चालकांचे धाबे दणाणले आहेत.दीपक वसंत पानपाटील यांनी फिर्याद दिली आहे.

मार्केट यार्ड येथे गुरुवारी (दि.१६ ) सायंकाळी कृषी विभागाच्या पथकने रेड केली. त्यावेळी पृथ्वी ऍग्रो सर्व्हिसेस हजारीचा गोडाऊन मध्ये वरील वर्णनाचे व किमतीचे मुदतबाह्य कीटकनाशकांमध्ये फेरफार करण्यासाठी निळे व पांढऱ्या रंगाचे स्टिकर ब्लेड काळ्या रंगाची पक्की शाईचे पॅड थिनर रिमूव्हर रबरी शिक्के चा वापर करण्यासाठी गोडाऊन मधे ठेवून मुदतबाह्य कीडनाशके विक्री करण्यासाठी व ग्राहकांची शेतकऱयांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या कंपनीचे कीटकनाशके असा 1 लाख 4 हजार व मुदतबाह्य झालेले 17 लाख 84 हजार असा 18 लाख 88 हजार रुपयांचे कीटकनाशके साठवणूक करून ठेवलेली मिळून आली असल्याचे फिर्यादीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post