अहमदनगर - केडगाव परिसरात असणारे ATM चोरट्यांनी फोडत सुमारे आठ लाखाची रोकड लंपास केली तर सावेडी परिसरातील ATM फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला.या प्रकरणी कोतवाली व तोफखान पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
केडगाव परिसरातील जलराम बेकरी जवळ ऐक्सिस बँकेचे एटीम आहे. रविवारी (दि.12) रात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास चोरटे ATM मध्ये घुसले. चोरट्यांनी सोबत आणलेल्या गॅस कटरच्या मदतीने एटीम फोडत त्यातील 8 लाख 38 हजाराची रोकड लंपास केली. या प्रकरणी शेखर विजय भोसले यांनी फिर्याद दिली आहे.
तर सावेडी परिसरातील गुलमोहोर रोड भागातील आंध्र बँकचे ATM फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी मंगळवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास केेला. तोंडाला काळे कापड बांधून आलेल्या दोन चोरटे ATM मध्ये आलं होते. तयांनी सोबत आणलेल्या गॅस कटरने मशीन फोडण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पेददाकोटला राजेश रमेश यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे

Post a Comment