मोबाईल चोर जेरबंद
माय नगर वेब टीम
अहमदनगर
मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात राहुरी पोलिसांना पाहिजे असलेला आरोपी सुनील साहेबराव माळी (वय 28, रा.राहुरी खुर्द, ता.राहुरी, अ.नगर) यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून शिताफीने अटक केली. ही कारवाई राहुरी एसटी स्टॅन्ड येथे सोमवारी (दि.13) करण्यात आली.
राहुरी पोलिसांना चोरीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी सुनील साहेबराव माळी हा राहुरी बसस्थानक येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एसटी स्टॅन्डवर सापळा रचून सुनील माळी यास शिताफीने अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली, असता त्याने राहुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याची कबुली केली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील 5 हजार रुपये किंमतीचा नोकिया कंपनीचा मोबाईल जप्त केला. पुढील कारवाईकरिता त्यास राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकातील हे.कॉ. मनोज गोसावी, पो.ना. रवींद्र कर्डिले, राम माळी, सचिन अडबल, दीपक शिंदे, रविकिरण सोनटक्के, पो.कॉ. रोहित मिसाळ, चालक पो.नं. बबन बेरड यांनी केली आहे.

Post a Comment