बस-ट्रकची समोरासमोर जोरदार धडक, भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू

 


माय नगर वेब टीम 

नवी दिल्ली : राजस्थानातील हनुमानगढ जिल्ह्यात महामार्गावर भीषण अपघात घडला असून, बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन ५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर १२ हून अधिक जण जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगंगापूरहून जयपूरकडे जाणाऱ्या बसने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी समोरून येणाऱ्या ट्रकला बसची जोरदार धडक बसली. अपघात इतका भीषण होता की बसचा मोठ्या प्रमाणात चक्काचूर झाला.

घटनेनंतर परिसरात एकच आरडाओरड झाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. माहिती मिळताच पोलिस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना तातडीने रावतसर रुग्णालयात येथे दाखल करण्यात आले.

पोलिस अधिकारी संजय अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच ५ जणांचा रुग्णवाहिकेत मृत्यू झाला. सध्या ७ जखमींवर उपचार सुरू असून त्यापैकी ३ ते ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी इतर रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

पोलिसांनी मृतदेह शवगृहात पाठवून नातेवाईकांना माहिती देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी ती सुरळीत केली. नेमका अपघात कसा झाला याचा पुढील तपास सुरू आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post