सुनेत्रा पवार होणार नव्या उपमुख्यमंत्री! उद्या सायंकाळी होणार शपथविधी



माय नगर वेब टीम 

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची निवड करण्यासाठी उद्या, शनिवारी आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाईल. त्यानंतर पवार यांचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांचा राज्य मंत्रिमंडळात लगेचच समावेश करण्यात येणार आहे. हा शपथविधीचा समारंभ अत्यंत साधेपणाने पार पाडला जाईल. सायंकाळी ५ वाजता शपथविधी सोहळा पार पडण्याची शक्यता आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडण‌वीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. तेव्हा पक्षाच्या वतीने सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. शनिवारी दुपारी विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडेल. त्यात सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड केली जाईल. राष्ट्रवादीच्या वतीने लगेचच मुख्यमंत्र्यांकडे निवडीचे पत्र दिले जाणार आहे. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी लगेचच पार पडेल, असे समजते. अर्थात, राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या नियोजित कार्यक्रमावर ते अवलंबून असेल.


महाराष्ट्राला मिळणार पहिलीच महिला उपमुख्यमंत्री? जाणून घ्या सुनेत्रा पवार यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी काही वेळा माध्यमांशी बोलताना म्हटले की, उद्या (३१ जानेवारी) सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार) आमदारांची बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीत विधिमंडळ पक्षनेतेपदी शिक्कामोर्तब केले जाईल. त्यानंतर उद्याच उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार पडेल.


सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदी, उद्या सायंकाळी होणार शपथविधी

राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची निवड करण्यासाठी उद्या, शनिवारी आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाईल. त्यानंतर पवार यांचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांचा राज्य मंत्रिमंडळात लगेचच समावेश करण्यात येणार आहे. हा शपथविधीचा समारंभ अत्यंत साधेपणाने पार पाडला जाईल. सायंकाळी ५ वाजता शपथविधी सोहळा पार पडण्याची शक्यता आहे.


देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “कुठलाही निर्णय जो घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल. राष्ट्रवादी पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी आम्ही सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून उभे राहू. त्यामुळे अजितदादांचे कुटुंब असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, याच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत. त्यांचे जे काही निर्णय होतील, त्यांना योग्य ते समर्थन आमच्याकडून असेल,” अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपमुख्यमंत्री पदासाठीच्या नावाचा काही प्रस्ताव आला आहे का? असे फडणवीसांना विचारण्यात आले. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, “माझ्याशी दोन वेळा चर्चा करून ते गेले आहेत. \त्यांनी त्यांची कार्यपद्धती आणि काय पर्याय आहेत याबाबत चर्चा केली आहे. मात्र अंतिम निर्णय हा त्यांचा पक्ष घेईल, त्यामुळे त्यासंदर्भात मी बोलणे योग्य होणार नाही,” असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post