नवी दिल्ली -
Delhi Red Fort Blast: लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामुळे दिल्ली हादरली आहे. एका कारमध्ये झालेल्या या स्फोटानंतर आग लागली. या आगीत तीन ते चार गाड्या जळून खाक झाल्या आहेत. या स्फोटानंतर घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाने धाव घेतली होती. या स्फोटात आतापर्यंत काय काय घडलं आहे हे जाणून घ्या
- संध्याकाळी 6.45 च्या सुमारास लाल किल्ल्याजवळ स्फोट
- लाल किल्ल्याजवळ कारमध्ये झालेल्या स्फोटात 8 जणां मृत्यू आणि अनेक जखमी
- पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेल्या परिसरात झालेल्या स्फोटामुळे अनेक गाड्यांना आग
- अग्निशमन दलाच्या किमान 20 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या
- लाल किल्ल्याजवळील पुरानी दिल्ली (जुनी दिल्ली) येथील परिसर राष्ट्रीय राजधानीतील सर्वात जास्त गर्दीच्या ठिकाणांपैकी एक आहे.
- दिल्ली पोलिसांचे विशेष पथक परिसरात पोहोचले आहे. त्यांनी स्फोटाच्या ठिकाणी घेराबंदी केली आहे.
- जुनी दिल्ली भागातील वाहतूक वळवण्यात आली आहे.
- दिल्लीत हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
- दिल्ली पोलिसांनी केद्रींय गृह विभागाशी चर्चा केली
- NIA ची टीम घटनास्थळी थोड्याच वेळात दाखल होणार आहे.
- दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईही हाय अलर्टवर
- मुंबई पोलीस अलर्ट मोडवर असून, महत्वाच्या ठिकाणांवर मुंबई पोलिसाची करडी नजर आहे.
- महाराष्ट्र सदनचे गेट बंद करण्यात आले. लाल किल्ला येथील स्फोटाच्या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव महाराष्ट्र सदनाचे गेट बंद केले. महाराष्ट्र सदन इंडिया गेट जवळ आहे.
- तिघे गंभीर जखमी आहेत. एकाची प्रकृती स्थिर आहे.
- सर्व अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. गस्त वाढवण्यात आली आहे. संवेदनशील भागात पोलिस दल तैनात आहे.
- उत्तर प्रदेशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे, मुख्यमंत्री योगी यांनी पोलिसांना कडक दक्षता ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री योगी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आणि क्षेत्रात जाण्याचे निर्देश दिले आहेत.
- दिल्ली पोलिसांनी तपासासाठी अनेक पथके तयार केली

Post a Comment