भैरवनाथ मित्र मंडळाच्या शारदीय नवरात्र उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 


माय नगर वेब टीम

अहिल्यानगर : भैरवनाथ मित्र मंडळ,चिचोंडी  पाटील आयोजित शारदीय नवरात्र उत्सव यंदा उत्साहात व भक्तिभावात पार पडला. यंदा १७ वे वर्ष साजरे करताना मंडळाने घटस्थापना व देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून नवरात्र उत्सवाची सुरुवात केली.





रोज महिलांसाठी, लहान मुलांसाठी तसेच भाविकांसाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. 

दररोज रात्री देवीची महाआरती परिसरातील सामाजिक कार्यकर्ते,धार्मिक क्षेत्रातील मंडळी, डॉक्टर्स,महिला बचत गट,पत्रकार,तरुण मंडळ पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी,देणगीदार यांचे शुभहस्ते करण्यात आली.

भाविकांच्या मनोरंजनासाठी भजनसंध्या,आराधी गाणी,संगीत खुर्ची,लिंबू चमचा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम व दांडिया नृत्य महोत्सव असे आकर्षक कार्यक्रम झाले.

उत्सवाच्या शेवटच्या दिवशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. महिषासुर वधाचा देखावा,कालिका मातेसह शिव तांडव नृत्य आणि महिलांच्या प्रचंड सहभागासह दांडिया नृत्य हा उत्सवाचा मुख्य आकर्षण ठरला.

या प्रसंगी जागृत देवस्थान भैरवनाथ मंदिराच्या सुरू असलेल्या पंचक्रोशीतील सर्वांत भव्य अशा जीर्णोद्धार कामासाठी मदत करावी, असे आवाहन मंडळाचे नगर पंचायत समितीचे माजी सभापती इंजि. प्रविण कोकाटे यांनी केले.

मंडळाला संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, माजी सरपंच पांडुरंग कोकाटे, भाऊसाहेब काळदाते सर आदींचे मार्गदर्शन लाभले.

उत्सव यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष आप्पासाहेब सदाफुले,उपाध्यक्ष विशाल भोसले,संतोष शेळके,कार्याध्यक्ष दत्ता जटाडे, सचिव रमेश कुलथे,खजिनदार बबनराव वाडेकर, सहसचिव दिपक कांबळे,दिनेश वाडेकर,प्रशांत कांबळे, गणेश वाडेकर,भाऊसाहेब वाडेकर, गोरख वाडेकर,बाबासाहेब परकाळे, गणेश गवांडे,आकाश वाडेकर,तुषार सदाफुले,प्रथमेश वाडेकर,संतोष पावसे, प्रतिक जटाडे,  प्रफुल्ल माने, अतुल वाटाडे, प्रशांत कोकाटे,सचिन नालकुल, अमोल ठोंबरे, किशोर सदाफुले, विशाल वाडेकर, अविनाश गवांडे, भाऊसाहेब ठोंबरे,सुनील बेल्हेकर, संजय कोकाटे, किरण वाटाडे, सुरज पवार,प्रकाश खडके, बाबासाहेब वाडेकर, महेश वाटाडे, नानासाहेब कोकाटे, शुभम वाडेकर, शुभम कानडे, सागर वाडेकर, लक्ष्मण कोकाटे,भाऊ पांजरे, संदिप काळदाते, अंबादास मांढरे, कानिफनाथ आगलावे, बाळा वाटाडे, ऋषिकेश वाडेकर, तुषार वाडेकर, गौरव ठोंबरे, आर्यन कोळी, आबा तनपुरे सर्व सभासद व युवकांनी विशेष परिश्रम घेतले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post