साकळाई योजना कृती समितीची बैठक हिवरे झरे येथे संपन्न
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : नगर तालुक्यातील हिवरे झरे येथे साकळाई योजना कृती समितीची बैठक उत्साही वातावरणात पार पडली. यावेळी सर्व सदस्यांनी योजना लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय मान्यता घेऊन तात्काळ भूमिपूजन करावे व प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी जोरदार मागणी केली.
बैठकीत मराठा आरक्षणासाठी न्याय मिळवून दिल्याबद्दल उपसमितीचे अध्यक्ष नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचा विशेष अभिनंदन ठराव करण्यात आला. तसेच डॉ. सुजय विखे पाटील, आमदार शिवाजीराव कर्डिले व आमदार विक्रम पाचपुते यांनी साकळाई योजनेसाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल त्यांचेही कौतुक करून अभिनंदन करण्यात आले.
योजना जलद गतीने पूर्ण करण्यासाठी कृती समितीकडून हालचाली सुरू असून, जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबई येथे भेट घेण्यासाठी संपर्क साधला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत ही बैठक होणार असून त्यानंतर समितीची पुढील भूमिका स्पष्ट करण्यात येणार आहे.
बैठकीस साकळाई योजना कृती समितीचे अध्यक्ष ह. भ. प. बाबा महाराज झेंडे, संतोष राव लगड, नारायणराव रोडे, सोमनाथ घाडगे, योगेंद्र खाकाळ, मा. सरपंच सुरेश काटे, मार्केट कमिटीचे संचालक रामदास झेंडे, माजी सभापती प्रतापराव नलगे, कोळगावचे सरपंच पुरुषोत्तम भैय्या लगड, चिखली गावचे सरपंच कुलदीप भैय्या कदम, विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन गोरख सुभाष झेंडे, तंटामुक्ती अध्यक्ष केशव झेंडे, रोहिदास उदमले, तुकाराम काळे, मेजर एन. डी. कासार, धस मॅडम, पक्कडराव झरेकर, सुभाष काटे, नितीन राव नलगे, उपसरपंच सुधीर झेंडे यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
योजनेच्या कार्यवाहीस गती मिळावी आणि गावकऱ्यांच्या हितासाठी योजना लवकर पूर्ण व्हावी यासाठी समितीचे सदस्य एकजुटीने प्रयत्नशील आहेत. पुढील बैठकीत योजना अंमलबजावणीसाठी ठोस निर्णय अपेक्षित आहे.
Post a Comment