नगर-दौंड रोड अरणगाव परिसरातील घटना | तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर नगर-दौंड महामार्गावरील अरणगाव परिसरात हल्ला झाल्याची घटना घडली आहे. अहिल्यानगरमधील पाथड तालुक्यातील दैत्यनांदूर येथे ओबीसी समाजासाठी आयोजित मेळाव्यासाठी ते चालले होते. अरणगाव परिसरातील एका हॉटेलवर ते नाष्टा करण्यासाठी थांबले होते. पुढे जात असतांनाच त्यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या आहेत. लक्ष्मण हाके यांना काही झालेलं नाही. परंतु, मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, नगर तालुका पोलिसांनी गोरख दळवी, संभाजी सप्रे, गणेश होळकर या तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
सविस्तर असे की, पाथड तालुक्यातील दैत्य नांदूर येथे ओबीसी एल्गार सभेसाठी लक्ष्मण हाके पुण्याहून पाथडकडे चालले होते. अरणगाव परिसरातील एका हॉटेलवर ते चहा पाणी व नाष्ट्यासाठी थांबले होते. पुढे जात असतांनाच पावणे बारा वाजेच्यासुमारास हाके यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे तेथे तणावाची परिस्थिती तयारी झाली होती. हाके यांच्यासोबत पोलिस बंदोबस्त असल्यामुळे पोलिसांनी नियंत्रणात आणली. आणि हाके यांचा ताफा बाह्यवळण रस्त्याने सोलापूर रोडकडे रवाना झाले.
दरम्यान, हाके यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेते तिघा जणांना ताब्यात घेतले आहे.
तिघे जण ताब्यात ः एसपी घार्गे
शनिवारी बारा वाजेच्या दरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाके दौंडकडून पाथड कडे जात होते. नगर तालुक्याच्या हद्दीत एका ठिकाणी नाष्ट्यासाठी थांबले होते. नाष्टाकरुन परत जात असतांना काही इसमांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यांच्यापैकी तिघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हल्ल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
Post a Comment