माय नगर वेब टीम
राहुरी – राहुरी पोलिसांनी चोरीच्या गाड्यांचा शोध घेण्यासाठी राबविलेल्या विशेष मोहिमेदरम्यान आज (दि. २४ सप्टेंबर) तब्बल ३५ दुचाकी वाहने विना नंबर प्लेट आढळून आली. या सर्व वाहनांवर एकूण १८,५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी तालुक्यातील काही चोरांकडून दुचाकी अल्पदरात विकल्या जातात व त्या विना नंबर प्लेट वापरल्या जात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते. त्यानंतर पोलिसांनी तपासणी मोहीम हाती घेतली. जप्त वाहनांवर योग्य नंबर प्लेट बसवून त्या गाड्या मालकांच्या ताब्यात देण्यात आल्या.
👉 नागरिकांना पोलिसांचे आवाहन –
- सर्व दुचाकी व चारचाकी वाहनधारकांनी पुढील व मागील नंबर प्लेट अनिवार्यपणे बसवाव्यात.
- चोरीची वाहने ओळखणे सोपे होण्यासाठी नंबर प्लेट महत्त्वाची आहे.
- पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने चालवण्यास देऊ नये; अन्यथा पालकांवरच कायदेशीर कारवाई केली जाईल.
ही मोहीम पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे व उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. राहुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोसई सप्तर्षी, स.फो. भाऊसाहेब आव्हाड, पो.हे.काँ. फुलमळी व होमगार्ड पथकाने ही कारवाई केली.
नवीन वाहनांवर नंबर प्लेट न बसविता रोडवर आणणाऱ्या शोरूमचालकांवर देखील आरटीओमार्फत कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
Post a Comment