माय नगर वेब टीम
वर्धा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या 288 जागांसाठी आज संपूर्ण राज्यात मतदान पार पडत आहे. यादरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येताना दिसत आहेत. राज्यात काही ठिकाणी मारहाणीच्या घटना घडल्या आहे. वर्ध्यामध्ये नितेश कराळे यांना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
काय घडले नेमके?
वर्ध्याच्या उमरी इथं शरद पवार गट आणि भाजपा कार्यकर्त्यांत राडा झाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते नितेश कराळे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बुथ लावण्याच्या कारणातून बाचाबाची झाली. यानंतर या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचे दोन्ही गट आमने सामने आल्याने वातावरण तापले आहे. या घटनेची माहिती मिळताच सावंगी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या त्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Post a Comment