महाराष्ट्राचा धक्कादायक एक्झिट पोल; कुणाला धक्का, कुणाला गुलाल

 




माय नगर वेब टीम 

Maharashtra Exit Poll: शिंदे-फडणवीस की ठाकरे-पवार? महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? Exit Poll ने दिला कौल: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं असून, आता सर्वांचं लक्ष 23 नोव्हेंबरला येणाऱ्या निकालाकडे आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटीनंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने या निकालाकडे फक्त महाराष्ट्र नाही तर देशाचं लक्ष आहे. हा निकाल अनेकांचं भवितव्य ठरवणारा आहे. दरम्यान निकालाआधी आम्ही तुमच्यासाठी एक्झिट पोल घेऊन आलो आहोत. Zeenia AI Exit Poll मध्ये महाराष्ट्रात निकाल काय असेल याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


कोणत्या एक्झिट पोल्सचा अंदाज काय?

पी-एमएआरक्यू पोल्सचा अंदाज काय?

पी-एमएआरक्यूने महायुती १३७ ते १५७ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. तर महाविकास आघाडीला १२६ ते १४६ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे, तसेच इतर २ ते ८ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

चाणक्यचा एक्झिट पोल काय?

महायुती १५२ ते १६० : भाजप-९०, शिवसेना शिंदे-४८, राष्ट्रवादी (अजित पवार) २२
महाविकास आघाडी १३० ते १३८ : काँग्रेस-६३, शिवसेना (ठाकरे) ३५, राष्ट्रवादी (शरद पवार) ४० आणि इतर ६ ते ८

मॅट्रीक्सचा एक्झिट पोल काय?

महायुती १५० ते १७० : भाजप-८९ ते१०१, शिवसेना शिंदे-३७ ते ४५, राष्ट्रवादी (अजित पवार) १७ ते २६

महाविकास आघाडी ११० ते १३० : काँग्रेस-३९ ते ४७, शिवसेना (ठाकरे) २१ ते ३९, राष्ट्रवादी (शरद पवार) ३५ ते ४३

पोल डायरीचा अंदाज काय?
महायुतीच्या पोल्सनुसार महायुतीला १२२ ते १८६ आणि महाविकास आघाडीला ६९ ते १२१ जागा मिळण्याचा अंदाज. यामध्ये महायुतीत भाजपाला ७७ ते १०८, शिवसेना (शिंदे) २७ -५०, राष्ट्रवादी (अजित पवार) १८ ते २८. तसेच महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस २८-४७, शिवसेना (ठाकरे) १६ ते ३५, राष्ट्रवादी (शरद पवार) २५ ते ३९ जागा मिळतील असा अंदाज.

पीपल्स पल्स एक्झिट पोलचा अंदाज काय?

पीपल्स पल्स एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, भाजपाच्या नेतृत्वाखालील युती १७५ ते १९५ जागा जिंकेल. तसेच महाविकास आघाडी ८५ ते ११२ जागा जिंकेल. तसेच अपक्ष आणि इतर पक्ष ७ ते १२ जागा जिंकतील.

पोलस्टर एक्झिट पोलचा अंदाज काय?

भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती महाराष्ट्रात १५० ते १७० जागा जिंकेल. तसेच महाविकास आघाडी ११० ते १३० जागा जिंकेल आणि अपक्ष आणि इतर पक्ष ८ ते १० जागा जिंकतील.

टाईम्स नाऊ एक्झिट पोलचा अंदाज काय?

महायुतीला १०५ ते १२६, महाविकास आघाडीला ६८ ते ९१ आणि इतर पक्ष आणि अपक्षाला ८ ते १२ जागा मिळतील असा अंदाज आहे.

लोकशाही-मराठी रुद्र एक्झिट पोलचा अंदाज काय?

महायुतीला १२८ ते १४२ आणि महाविकास आघाडीला १२४ ते १४० जागा मिळतील असा अंदाज आहे. तसेच इतर पक्ष आणि अपक्षाला १८ ते २३ जागा मिळतील असा अंदाज आहे.


महाराष्ट्रात काय निकाल असेल?

एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढाई दिसत आहे. वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार, महायुतीला 129 ते 159 आणि महाविकास आघाडीला 124 ते 154 जागा मिळतील. 

महाराष्ट्र  - 288

महायुती    129-159

मविआ       124-154

मुंबई  -    36 

महायुती  15-20

मविआ    15-20

इतर       00-01

ठाणे-कोकण -  39 

महायुती     23-28

मविआ       9-14

इतर           00-03

विदर्भ    62

महायुती  32-37

मविआ    24-29

इतर      00-02

मराठवाडा 46 

महायुती  16-21

मविआ    24-29

इतर        00-02

पश्चिम महाराष्ट्र  70

महायुती  28-33  

मविआ    37-42

इतर      00-01

खान्देश 35

महायुती  15-20

मविआ     15-20

इतर        00-01

महाराष्ट्रातील लढत कशी?

महाराष्ट्रात सत्ताधारी महायुती (भाजपा, शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी) आणि महाविकास आघाडी (उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस) यांच्यात लढत आहे. महायुतीत भाजपा 149, शिवसेना 81 तर अजित पवार यांची राष्ट्रवादी 59 जागांवर निवडणूक लढवत आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेस 101, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) 95 आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी 86 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. याशिवाय मनसे, बहुजन समाज पक्ष आणि एमआयएम हेदेखील निवडणुकीत आहेत. 


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post