माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात माजी आमदार राहुल जगताप यांनी आपला उमेदवारी भव्य शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला.
काहीही झाले तरी आता माघार नाही असे म्हणत त्यांनी निवडणूक लढविणारच हा आपला अंतिम निर्णय सांगून टाकला.माझ्या उमेदवारीचा निर्णय हा मुंबई मध्ये नाही तर श्रीगोंदा मधील जनता घेणार आहे. तालुक्याच्या विकास काम निधीत कोणी किती टक्केवारी खाल्ली हे तालुक्यातील जनतेला माहिती आहे असा घणाघात विद्यमान आमदार पाचपुते यांचे नाव न घेता केला.आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झालेली गर्दी हा आजवरचा उच्चांक असल्याचे नागरिक सांगत आहेत.
Post a Comment