शरद पवारांच्या राष्ट्रवादीची चौथी यादी जाहीर, अनिल देशमुखांच्या जागी...



माय नगर वेब टीम 

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरचे दोन दोन दिवस शिल्लक असतानाही महायुती आणि महाविकास आघाडीतील घोळ संपलेले नाहीत. दोन्ही आघाड्यांतील सर्वच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आहे. बंडोबांना शांत करण्याची मोहीम पक्षांच्या नेत्यांना हाती घ्यावी लागली आहे. महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम असतानाच महाविकास आघाडीतील सुंदोपसुंदीही चव्हाट्यावर आली आहे. तर, आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास वेग येणार आहे. काहींनी गुरुपुष्यामृत योग म्हणजेच २४ ऑक्टोबर रोजी अर्ज भरले. तर, उर्वरित आज आणि उद्यामध्ये अर्ज दाखल करतील. बारामती विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी अजित पवार आणि युगेंद्र पवार यांनी आज अर्ज दाखल केले आहेत. तर, ठाण्यात संजय केळकर, एकनाथ शिंदेा यांनी मोठं शक्तीप्रदर्शन केलंय.


आतापर्यंत जाहीर झालेले उमेदवार किती?

महाविकास आघाडी

काँग्रेस – १००

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – ७६

शिवसेना (उद्धव ठाकरे) – ८४


महायुती

भाजपा – १४६

शिवेसना (एकनाथ शिंदे) – ६५

राष्ट्रवादी (अजित पवार) – ४९

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post