मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची दुसरी यादी जाहीर; नगरमध्ये कोणाला मिळाली संधी



माय नगर वेब टीम 

मुंबई – विधानसभा निवडणुक 2024साठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी पत्रकार परिषदेत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.

दुसऱ्या यादीमध्ये एकूण 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या यादीमध्ये पक्षाकडून 45 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता दुसरी यादी समोर आली आहे.

दुसऱ्या यादीतील उमेदवारांची नावे-मतदारसंघ

मतदारसंघ क्र. मतदार संघाचे नाव उमेदवाराचे नाव

16 एरंडोल सतीश अण्णा पाटील

44 आर्वी मयुरा काळे

111 गंगापूर सतीश चव्हाण

116 बागलाण दीपिका चव्हाण

119 येवला माणिकराव शिंदे

120 सिन्नर उदय सांगळे

122 दिंडोरी सुनीताताई चारोसकर

123 नाशिक पूर्व गणेश गिते

135 शहापूर पांडुरंग बरोरा

141 उल्हास नगर ओमी कलानी

195 जुन्नर सत्यशील शेरकर

206 पिंपरी सुलक्षणा शिलवंत

211 खडकवासला सचिन दोडके

212 पर्वती अश्विनीताई कदम

216 अकोले अमित भांगरे

225 अहिल्यानगर शहर अभिषेक कळमकर

230 बीड संदीप क्षीरसागर

243 परंडा राहुल मोटे

254 माळशिरस उत्तम जानकर

255 फलटण दीपक चव्हाण

271 चंदगड नंदिनीताई कुपेकर

279 इचलकरंजी मदन कारंडे


दरम्यान, उमेदवार यादी जाहीर करताना पत्रकारपरिषदेत सरकारवर हल्लाबोल करत जयंत पाटील म्हणाले, लाडक्या बहि‍णींना निवडणुकीपुरतेच गोंरजण्याचे काम सुरू आहे. जयश्री थोरात यांच्याबद्दल जे विधान करण्यात आले ते अत्यंत दुर्दैवी होते. लाडक्या बहिणींना कसे वागवले जाते हे राज्याने पाहिले.


कापूस आणि सोयाबिणचे मोठे नुकसाने झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. मात्र महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांना कोणतीही मदत केली नाही, आज दिवसाला दोन शेतकरी आत्महत्या करत आहेत, असे जयंत पाटील यांनी म्हटले.


राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आतापर्यंत 67 उमेदवार जाहीर –

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पहिल्या यादीत एकूण 45 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती, तर दुसऱ्या यादीमध्ये आता 22 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून आतापर्यंत एकूण 67 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post