माय नगर वेब टीम
मुंबई : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण २२ उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी पक्षाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत ९९ उमेदवारांचा समावेश होता. दोन्ही याद्या मिळून भाजपाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत १२१ उमेदवार जाहीर केले आहेत. आज भाजपाने जाहीर केलेल्या यादीत राम भदाणे यांना धुळे ग्रामीण मधून तर श्याम खोडे यांना वाशिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. सत्यजीत देशमुखांना शिराळा मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. त्याचबरोबर गोपीचंद पडळकरांना जत मतदारसंघातून उणेदवारी देण्यात आली आहे. यासह नाशिक मध्य या विधानसभा मतदारसंघावरून मोठी रस्सीखेच चालू होती, त्यावर भाजपाने तोडगा काढला आहे. पक्षाने देवयानी फरांदे यांना नाशिक मध्य या मतदारसंघातून विधानसभेचं तिकीट दिलं आहे.
याआधी भाजपाने ९९ उमेदवार जाहीर केले होते. यामध्ये भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तर प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच आशिष शेलार यांना वांद्रे पश्चिम, अतुल भातखळकर यांना कांदिवली पूर्व, राम कदम यांना घाटकोपर पश्चिम, मीहिर कोटेचा यांना मुलूंड, गणेश नाईक यांना ऐरोली, रविंद्र चव्हाण यांना डोंबिवली, चंद्रकांतदादा पाटील यांना कोथरूड, तर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कुलाबा मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे.
दुसऱ्या यादीतील सर्व २२ उमेदवारांची नावे
क्र मतदारसंघ उमेदवाराचं नाव
1 धुळे ग्रामीण राम भदाणे
2 मलकापूर चैनसुख संचेती
3 अकोट प्रकाश भारसाकळे
4 अकोला पश्चिम विजय अग्रवाल
5 वाशिम श्याम खोडे
6 मेळघाड केवलराम काळे
7 गडचिरोली मिलिंद नरोटे
8 राजुरा देवराम भोंगळे
9 ब्रह्मपुरी कृष्णलाल सहारे
10 वरोरा करण संजय देवतळे
11 नाशिक मध्य देवयानी फरांदे
12 विक्रमगड हरिश्चंद्र भोये
13 उल्हासनगर कुमार ऐलानी
14 पेण रावींद्र पाटील
15 खडकवासला भीमराव तपकीर
16 पुणे छावणी सुनील कांबळे
17 कसबा पेठ हेमंत रासणे
18 लातूर ग्रामीण रमेश कराड</td>
19 सोलापूर शहर मध्य देवेंद्र कोठे
20 पंढरपूर समाधान औताडे
21 शिराळा सत्यजीत देशमुख
22 जत गोपीचंद पडळकर
Post a Comment