माय नगर वेब टीम
संगमनेर - भारतीय जनता पार्टीला दंगली घडवायच्या आहेत. भाजपा संस्कारहीन पक्ष आहे, विकृत लोक त्या पक्षात भरलेले आहेत. घरंदाज व राजकारणातल्या चांगल्या स्त्रियांविषयी अपशब्द वापरणे आणि त्यातून तणाव निर्माण करणं हा नवीन धंदा त्यांनी सुरू केला आहे. असं म्हणत ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी जयश्री थोरातांसदर्भात भाजपा नेते वसंतराव देशमुख यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, आगामी विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यातील सर्वंच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. अनेक उमेदवारांनी राजकीय प्रचाराला सुरु केली आहे. याचदरम्यान अहमदनगरमधील संगमनेर जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे. भाजपच्या एका जाहीर सभेत वसंत देशमुख यांनी माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात आक्षेपार्ह विधान केले होते.
नेमकं काय म्हणाले वसंत देशमुख
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांच्या संकल्प सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. यासभेत सुजय विखे मंचावर असताना भाजपचे वसंत देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं. आपल्या कन्येला समजवा…नाहीतर आम्ही निवडणुकीच्या काळात मैदानात उतरलो, तर तुमची मुलगी घराबाहेर पडणार नाही. सुजय विखे पाटील, त्यांना ताई म्हणातात. पण सुजयदादा या ताईचे पराक्रम सगळ्या तालुक्याला माहिती आहे, असं वक्तव्य वसंत देशमुख यांनी केले. वसंत देशमुखांच्या या विधानानंतर संगमनेरमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं.
Post a Comment