केडगाव फटाका मार्केटमध्ये ग्राहकांची रेलचेल; माफक दरात ब्रँडेड फटाके उपलब्ध : फॅन्सी फटाक्यांना मागणी

 


माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर : केडगाव फटाका असोशियन तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी नगर - पुणे रोडवरील केडगाव औद्योगिक वसाहती समोरील मैदानात फटाका मार्केट उभारण्यात आले आहे. या ठिकाणी बाहेर गावावरून येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

पुणे नाशिक औरंगाबाद विदर्भ मराठवाडा जळगाव बीड येथे दिवाळी निमित्त जाणाऱ्या येणाऱ्या प्रवासांची चांगली पसंती मिळत आहे. शेवटचे तीन दिवस भरपूर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. केडगाव संपूर्ण परिसर विनायक नगर रेल्वे स्टेशन चास अकोळनेर सोनेवाडी सारोळा नेप्ती तसेच आजूबाजूच्या भरपूर गावांचा प्रतिसाद मिळतो. येथे रास्त भावात विविध कंपन्यांचे फटाके मिळतात ग्राहकांचे ग्राहकांची वेगवेगळ्या कंपन्यांच्या फटाक्यांना मागणी आहे .फॅन्सी फटाक्यांची मागणी भरपूर प्रमाणात आहे. ग्राहकांच्या सुरक्षेसाठी येथे सिक्युरिटी गार्ड ठेवण्यात आले आहेत .

पार्किंगची मोठी सुविधा करण्यात आली आहे. तरी सर्व असोसिएशनच्या वतीने आपणा सर्वांना आवाहन करीत आहे कि फटाके खरेदी करण्यासाठी केडगाव फटाका मार्केट येथे या व फटाके खरेदी करण्याचा लाभ घ्या या ठिकाणी एकदम रिजनेबल किमतीमध्ये फटाके विक्री चालू आहे असे फटाका संघटनेचे अध्यक्ष  किरण गुंड, उपाध्यक्ष एकनाथ कोतकर, संतोष फसले ,राजेंद्र सातपुते, संतोष गुंड ,शुभम रासकर ,भाऊ घुले जाकिर मणियार, निशांत भोगे व असोसिएशनचे सर्व सदस्य  फटाके खरेदी करण्यास येण्याचे आवाहन करीत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post