माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे उद्या भव्य शक्तिप्रदर्शन



माय नगर वेब टीम 

राहुरी : राहुरी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. कर्डिले मंगळवार दि.29 ऑक्टोबर 2024 रोजी राहुरी येथे मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य मिरवणूक काढून कर्डिले अर्ज दाखल करणार आहेत.

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस आहे. राहुरी मतदारसंघात उमेदवारी जाहीर झाल्यापासून शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी तालुका पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. गावनिहाय भेटी देत कर्डिले मतदारांशी संवाद साधत आहेत. या प्रचारा दरम्यान त्यांना मोठे समर्थन मिळत असल्याचेही सांगण्यात येत आहे. प्रत्येक गावात होणारे उत्स्फूर्त स्वागत आणि स्थानिक पदाधिकारी, मतदारांकडून व्यक्त होणाऱ्या भावना पाहता यंदा परिवर्तन अटळ असल्याचे कर्डिले यांनी म्हटले आहे.

राहुरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अनेक दिग्गज नेत्यांनी तसेच पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून कर्डिलेंना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राहुरी तालुक्यात कर्डिलेंचा जोर वाढला आहे. उद्या भव्य शक्तिप्रदर्शन हजारो समर्थक उपस्थित राहणार असल्याचे  सांगितले जात आहे. 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post