उपनिरीक्षक व पोलीस भरतीची कार्यवाही करा ; खा. नीलेश लंके यांची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी



माय नगर वेब टीम 

अहमदनगर : महाराष्ट्र पोलीस दलात रिक्त असलेली पोलीस शिपायांची १८ हजार ५०० पदांची भरती प्रक्रिया तसेच पोलीस निरीक्षक पदांच्या भरतीसाठीचे मागणीपत्र राज्य लोकसेवा आयोगाकडे आचारसंहितेपुर्वी पाठविण्यात यावे अशी मागणी खासदार नीलेश लंके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोन स्वतंत्र पत्राद्वारे केली आहे. 

       पोलीस शिपायांच्या १८ हजार ५०० पदांच्या भरतीसंदर्भात पाठविण्यात आलेल्या पत्रात नमुद करण्यात आले आहे की, राज्यातील लाखो तरूण-तरूणी महाराष्ट्र पोलीस दलात भरती होऊन सेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहेत. त्यासाठी रात्रंदिवस मेहनत करून तयारी करत आहेत. आज रोजी गृहविभागाकडे पोलीस शिपायांची अनेक पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहितेपूर्वी जाहिरात प्रसिध्द करावी यासाठी परीक्षार्थी विद्यार्थी आपणाकडे तसेच संबंधित विभागाकडे वारंवार मागणी करत असल्याकडेही खा. लंके यांनी लक्ष वेधले आहे. 

        पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरतीबाबत फडणवीस  यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात नमुद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या १८ सप्टेंबर २०२४ रोजी प्रसिध्द झालेल्या जाहिरातीनुसार महाराष्ट्र अराजपत्रीत गट व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ची जाहिरात प्रसिध्द करण्यासाठी सुधारीत मागणीपत्र लोकसेवा आयोगाकडे पाठविण्यात आलेले नाही. त्यामुळे ही जाहिरात प्रसिध्द होउ शकत नाही. त्यातच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीची आचारसंहिता तोंडावर आली आहे. त्यामुळे सर्व स्पर्धा परीक्षार्थींनी आपणाकडे व सबंधित विभागाकडे वारंवार मागणी केलेली आहे. जाहिरात लवकर प्रसिध्द न झाल्यास स्पर्धा परीक्षांचा अभ्यास व सराव करणाऱ्या उमेदवारांचे वय वाढल्याने त्यांच्यावर अन्याय होणार असल्याचे खा. लंके यांनी या पत्रात नमुद केले आहे.  

वाढीव वयोमर्यादेचा फायदा व्हावा 

दि.३ मार्च २०२३ रोजी सामान्य प्रशासन विभागाने पोलीस शिपाई पदासाठी २ वर्षे कमाल वयोमर्यादा वाढवून दिली आहे. त्या अनुषंगाने आचारसंहिता लागू होण्यापूर्वी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिध्द झाल्यास अनेक परीक्षार्थींना त्याचा फायदा होईल असेही खा. लंके यांनी पत्रात नमुद केले आहे.  

वयाधिकांसाठी सहा महिने वय वाढवून द्या

महाराष्ट अराजपत्रीत गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ची जाहिरातीस सहा महिने उशिर झाल्याने या पदांसाठीची जाहिरात प्रसिध्द करून वयाधिक उमेदवारांना वयामध्ये सहा महिन्यांची वाढ देण्यात यावी अशी मागणीही खा. लंके यांनी केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post