नगरकरांनो, डिग्री घेणारा डॉक्टर हवा की प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करणारा डॉक्टर हवा; 'त्यांची' डाळ साखर भ्रष्टाचाराची, खासदार झाल्यानंतर करणार 'ही' मागणीसाखर डाळ वाटप प्रकरणी विखे पिता पुत्रांची ग्रीनीज वर्ल्ड बुक मध्ये नोंद करावी / आमदार निलेश लंकेचा राहुरीतील जनसंवाद यात्रेत हल्लाबोल

माय अहमदनगर वेब टीम 

पारनेर - भाजपचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये मतांसाठी डाळ साखर वाटप केली असून त्यांची गीनीज वर्ल्ड बुक मध्ये नोंद करावी अशी खोचक टिका आमदार निलेश लंके यांनी राहुरी येथील दौऱ्यामध्ये केली आहे. तर मी खासदार झाल्यानंतर संसदेमध्ये साखर डाळ वाटल्याबद्दल विखे पिता पुत्रांची गिनीज वर्ल्ड बुक मध्ये नोंद करावी अशी आग्रही मागणी करणार असल्याचेही आमदार निलेश लंके यांनी राहुरी दौऱ्यात सांगितले.

तर दुसरीकडे गेल्या अनेक वर्षांपासून विखे पिता- पुत्र  सत्तेत असताना त्यांना विकासाचे प्रश्न सोडवता आले नाही. त्यामुळे आपले अपयश झाकण्यासाठी विखे पाटील पिता पुत्राने महसूल विभगात भ्रष्टाचार करून डाळ साखर वाटली असल्याचा हल्लाबोल निलेश लंके यांनी राहुरी येथील जनसंवाद यात्रेदरम्यान केला आहे. तर त्यांनी नगर दक्षिण मध्ये जी डाळ साखर वाटली आहे ती भ्रष्टाचाराचे असल्याची माहिती समजली आहे. त्यामुळे लवकरच याची चौकशी लावणार असल्याचीही वक्तव्य राहुरी तालुक्यातील विविध गावांमध्ये निलेश लंके यांनी केले आहे. दरम्यान डिग्री घेणारा डॉक्टर महत्त्वाचा की प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करणारा डॉक्टर महत्त्वाचा हे आता जनतेने ठरवावे असेही ते म्हणाले.
 निलेश लंके यांची स्वाभिमान जनसेवा यात्रा राहुल चळक्यात दाखल झाले असून यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह राहुरी तालुक्यातील मल्हारवाडी मोमीन आखाडा म्हैसगाव तांबेरेवाडी घोरपडवाडी चिंचाळे सोनगाव सात्रळ यांच्यासह विद्वाडेवस्त्यावरील जनतेशी जाऊन संपर्क साधला.

यावेळी आमदार निलेश लंके म्हणाले की महसूल विभागाच्या पुरवठा शाखेच्या वतीने जो साखर आणि डाळीचा पुरवठा केला जातो तो पुरवठा यांनी दाबला असल्याचा आरोपही केला आहे. तर साखरही प्रवारा कारखान्याची असून कारखान्याची अवस्था तुम्ही काय केली हे सर्वांना माहीत आहे. तर दुसरीकडे आमदार खासदारांची कामे काय असतात हे जनतेला माहीत असून सार्वजनिक व वैयक्तिक योजना राबविणची जबाबदारी आमदार खासदारांकडे असते. खासदार सुजय विखे पाटील यांनी पाच वर्षात कोणतेही काम न करता साखर डाळ वाटली त्यामुळे आमदार तनपुरे साहेब तुम्ही पण कामे करू नका तुम्ही पण शेंगदाणे फुटाणे वाटा अशी खोचक टीका निलेश लंके यांनी केली आहे. यावेळी माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले की विविध योजना व अनुदानाच्या नावाखाली शेतकऱ्यांची फक्त पिळवणूक करण्याचे काम हे सरकार करत असून धडा शिकवण्याची वेळ आली असल्याचे हिम्मत त्यांनी व्यक्त केले. तर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला या सरकारने पाने पुसले असून वेळेत अनुदान जर सरकारने दिले असते तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता. त्यामुळे हे देशातील व राज्यातील सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका आमदार तनपुरे यांनी या दौऱ्या दरम्यान केली आहे.


खरा डॉक्टर मी का ते - निलेश लंके

कोरोनाच्या दोन लाटेमध्ये शरदचंद्र पवार कोविड सेंटरच्या माध्यमातून ३३ हजार रुग्ण मी खडखडीत बरे केले असून खरा डॉक्टर मी का तुम्ही असा थेट सवाल खासदार विखे पाटील यांना लंके यांनी केला आहे. त्यामुळे मुन्नाभाई एमबीबीएस डॉक्टर तुम्ही आहात. डिग्री घेणारा डॉक्टर महत्त्वाचा की प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करणारा डॉक्टर महत्त्वाचा हे जनतेने ठरवावे. तर कोरोना काळात तुम्ही शोबाजी केली असून हेलिकॉप्टरने रेमडिसेव्हर इंजेक्शन आणल्याचा कांगावा केला. टीव्ही पेपर मध्ये बातम्या छापून आणून फक्त प्रसिद्धीच्या झोतात राहिले. त्यामुळे डॉक्टरकीचे कौतुक तुम्ही सांगू नका अशी थेट आव्हान निलेश लंके यांनी खासदार सुजय विखे पाटील यांना दिले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post