'वाघ इतक्या लवकर गवत खायला सुरुवात करेल, असे वाटले नव्हते'माय अहमदनगर वेब टीम 

मुंबई  - ''राज ठाकरे दिल्ली दरबारी गेले, त्याचवेळी भाजप बरोबर जाणार हे मराठी जनतेला कळले होते. पण वाघ इतक्या लवकर गवत खायला सुरुवात करेल, असे वाटले नव्हते'', असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आज शिवतीर्थावर  मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी महायुती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. यावरच आपली प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार असं म्हणले.


विजय वडेट्टीवार म्हणाले, ''वाघाची शेळी झाली. शेली गवत खाईल, असे राज ठाकरे यांचे भाजपमध्ये जाऊन होऊ नये. राज ठाकरे या लढवय्या नेत्याने गुलामगिरीचे जोखड गळ्यात घातले का? राज ठाकरे महायुतीत गेल्याने महाविकास आघाडीच्या मतांवर परिणाम होणार नाही. २०१९ त्यांनी मोदी यांच्या विरोधात भूमिका घेतली, आता त्यांना पाठिंबा दिला.''

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post