नगरमध्ये राष्ट्रीय कबड्डीचा थरार!; २०० प्रो कबड्डीपटू होणार सहभागी




 ७० वी वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा : गत उपविजेत्या महाराष्ट्राच्या कामगिरीकडे देशाचे लक्ष :  : सायं . ५ वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार उदघाटन

माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर : नगरच्या वाडिया पार्क मैदानावर आजपासुन गुरूवार दि. २१ मार्च पासुन चार दिवस राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा थरार पाहवयास मिळणार आहे . देशभरातील संघाचे नगर शहरात आगमन झाले आहे . गुरूवारी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या हस्ते सायं ५ वाजता या स्पर्धेचे उदघाटन होणार आहे.

नगरच्या वाडिया पार्क मैदानावर दि .२१ मार्च ते दि .२४ मार्च दरम्यान रोज सायं ५ वाजल्यापासुन ७० वी वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा होणार आहे . यासाठी देशभरातील विविध राज्यांच्यातील संघ नगर शहरात दाखल झाले आहेत . गुरूवारी सायं ५ वाजता जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या हस्ते या राष्ट्रीय स्पर्धेचे उदघाटन होणार आहे अशी माहिती आयोजक व राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष प्रा . शशिकांत गाडे यांनी दिली . जिल्हा हौशी कबड्डी संघटना व राज्य कबड्डी संघटनेच्या वतीने नगर शहरात प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .



मागील वर्षी उपविजेता ठरलेल्या महाराष्ट्र संघाच्या कामगिरीकडे देशभरातील कबड्डी प्रेमींचे लक्ष लागले आहे . देशभरातील २०० प्रो कबड्डी खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी नगरच्या प्रेक्षकांना मिळणार आहे . महाराष्ट्राच्या संघात ८ प्रो कबड्डी खेळाडू आहेत . दि .१० मार्चपासुन महाराष्ट्र संघाचा सराव सुरु असुन यंदा महाराष्ट्राचाच संघ विजेतेपट पटकावेल असा विश्वास मुख्य प्रशिक्षक शांताराम जाधव , सहप्रशिक्षक दादासाहेब आव्हाड, व्यवस्थापक शंतनु पांडव यांनी व्यक्त केला आहे .स्पर्धेच्या आयोजनासाठी राज्य कबड्डी संघटनेचे सर्व पदाधिकारी नगरमध्ये दाखल झाले आहेत अशी माहिती जिल्हा संघटनेचे सहसचिव विजय मिस्कीन व उपाध्यक्ष जयंत वाघ यांनी दिली . प्रकाशझोतात हे सामने होणार आहेत .


 या राज्यातील संघ नगरमध्ये झाले दाखल

दिल्ली , हिमाचल , जम्मू काश्मीर,तामिळनाडू ,कर्नाटक , पश्चिमबंगाल ,छत्तीसगड,

गुजरात ,मध्यप्रदेश ,पंजाब ,

विदर्भ,मणिपूर, राजस्थान,झारखंड, भारतीय रेल्वे ,तेलंगणा,

 केरळ, बिहार , गोवा , उत्तर प्रदेश , शासकीय संघ

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post