ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात आगळावेगळा ठसा निर्माण करणारी शाळा 'यशश्री प्री स्कूल' जेऊर !

माय अहमदनगर वेब टीमपालकांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या पसंतीला उतरलेली शाळा !

पालकांचा विश्वास' सार्थ' ठरवत प्रगतीचा आलेख उंचावत आहे 

प्रवेश प्रक्रियेस सुरुवात !

नगर तालुका - नगर तालुक्यातील जेऊर येथील यशश्री प्री स्कूलने ग्रामीण भागात आपल्या कुशल व्यवस्थापनेतून शिक्षण क्षेत्रात आगळावेगळा ठसा निर्माण केला आहे.      जेऊर पंचक्रोशीतील पालक, विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरलेली शाळा म्हणून यशश्री प्री स्कूलने नावलौकिक मिळवला आहे. जेऊर, धनगरवाडी, पिंपळगाव माळवी, डोंगरगण, मांजरसुंबा गड, बहिरवाडी, ससेवाडी, पांढरीपुल, पांगरमल, मिरी, मजले चिंचोली, आव्हाडवाडी परिसरातील पालक आपल्या पाल्यांना यशश्री प्री स्कूल मध्ये प्रवेश घेण्यासाठी प्राधान्य देताना दिसून येतात. पालकांचाही विश्वास 'सार्थ' ठरवत यशश्री प्री स्कूलचे व्यवस्थापन विद्यार्थ्यांच्या पंखांना 'बळ' देण्याचे कार्य अविरतपणे करत आहेत.      यशश्री प्री स्कूलच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावताना पहावयास मिळत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न शाळेमार्फत नेहमीच करण्यात येत आहे. चिमुकल्यांचा शिक्षण क्षेत्रातील पाया भक्कम झाला तरच पुढील शिक्षणाची वाटचाल 'सुकर' बनते. त्यामुळे


येथे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभर नवनवीन असे अभिनव उपक्रम राबविले जातात. हे शाळेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.       प्रशिक्षित अनुभवी शिक्षक, मुलांकडे वैयक्तिक लक्ष, सुसज्ज इमारत, स्वच्छ व सुंदर परिसर, क्लासरूम, निसर्गरम्य वातावरण, बोलक्या भिंती, हसत खेळत शिक्षण, शिस्त, मर्यादित प्रवेश, शिक्षणाबाबत कटाक्ष, मैदानी खेळ, विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक उपक्रम, सर्व सण उत्सव, महामानवांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करण्याची पद्धत, समानतेची भावना, सांघिक खेळ, जास्तीत जास्त सराव, पालकांशी पाल्यांच्या प्रगतीबाबत सतत संपर्क, पालकांच्या सूचनांची दखल अशा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांमुळे यशश्री प्री स्कूलने चांगलाच नावलौकिक मिळविला आहे.       बाल वयातच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. प्रशिक्षित व अनुभवी शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांमधील प्रगतीचा अनुभव पालकांना येतो. पालकही पाल्याचा प्रवेश घेऊन निश्चित होत असल्याची भावना पालक वर्गांमधुन व्यक्त करण्यात येत आहे.__________________

..... सुवर्णसंधी प्रवेश प्रक्रियेस सुरुवात....

 यशश्री प्री स्कूलमध्ये नवीन प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.

 आपल्या पाल्यांच्या उज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा

 संपर्क:-

 * प्राचार्या सौ. मनीषा पवार - ७०२०८९७०४९ / ८९९९१७२२३३ / ९५२७५५३१०८

_________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post