बाबुर्डी बेंद च्या उपसरपंच पदी भाऊसाहेब चोभे यांची बिनविरोध निवड
माय नगर वेब टीम 

अहमदनगर -नगर तालुक्यातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या बाबुर्डी बेंद ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी भाऊसाहेब दशरथ चोभे यांची गुरुवारी बिनविरोध निवड झाली. उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंदची ग्रामपंचायत राजकीय दृष्टया महत्वाची मानली जाते. या ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदाची  निवडणूक  गुरुवारी पार पडली. उपसरपंच पदासाठी भाऊसाहेब दशरथ चोभे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. मंदा सुनील खेंगट या होत्या. उपसरपंचपदी भाऊसाहेब चोभे यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच राम वाळके, उदयोजक रघुनाथ चोभे, माजी उपसरपंच संदीप चोभे, डॉ, सुधीर चोभे, ज्ञानेश्वर चोभे, विठ्ठल घोलप, पोपट मोढवे आदी उपस्थित होते.गावामध्ये सर्वांना विचारात घेऊन गावचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे नवनिर्वाचित उपसरपंच भाऊसाहेब चोभे यांनी सांगितले. उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल चोभे यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post