माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका- पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण काळाची गरज आहे. देशातील वनांचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा खूपच कमी आहे. पर्यावरणाचा सर्वच घटकांवर परिणाम होत असून पर्यावरणाचा समतोल राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन यशश्री प्री स्कूल जेऊरच्या प्राचार्या सौ. मनीषा पवार यांनी केले आहे.
यशश्री प्री-स्कूल मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच नवनवीन उपक्रम राबविण्यात येत असतात. विद्यार्थ्यांना रंगांची माहिती व महत्त्व समजण्यासाठी 'कलर डे' साजरे करण्यात येत असतात. शुक्रवार दि. २८ रोजी पर्यावरण दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षक व चिमुकल्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
चिमुकल्यांनी विविध गाण्यांवर नृत्य करत पर्यावरण वाचविण्याचा संदेश दिला. हातामध्ये फ्लेक्स घेऊन पर्यावरण रक्षण करण्याबाबत प्रबोधन करण्यात आले. तसेच वृक्षाच्या आकारामध्ये उभे राहत वृक्षाची प्रतिकृती बनविण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी विविध आकर्षक कलाकृती बनवून आणल्या होत्या.
यावेळी बोलताना सौ. मनीषा पवार यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण, झाडांचे महत्त्व समजावून सांगितले. वृक्षारोपण व संवर्धन काळाची गरज आहे. कमी पर्जन्यमान हे जंगलांची कमी संख्या तसेच औद्योगीकरणाच्या नावाखाली होत असलेली जंगलांची कत्तल यामुळे होत आहे. ही बाब मानव समाजासाठी धोकादायक आहे. त्यासाठी सर्वांनी वृक्ष लागवड व संवर्धन करण्याचे आवाहन सौ.पवार यांनी केले.
याप्रसंगी सरपंच सौ. ज्योती तोडमल, यशश्री अकॅडमीच्या संचालिका अनुरीता शर्मा, गणेश शर्मा, दिव्या शर्मा, मार्गदर्शक राजेंद्र पवार, शिक्षिका नलिनी खंडागळे, दीपा पवार, दिपाली बनकर, वेदिका मगर, अंजली धनवळे उपस्थित होत्या.
__________________________
( प्रशिक्षित व अनुभवी शिक्षक / सर्वोत्तम व्यवस्थापन/ प्रशस्त जागा)
_____________________________________________
*शिक्षण क्षेत्रात नावाजलेले नाव यशश्री प्री स्कूल जेऊर*
*ॲडमिशन सुरू*
बालपणीच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने विविध उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात आपला आगळावेगळा ठसा निर्माण करणारे यशश्री अकॅडमी संचलित यशश्री प्री- स्कूल जेऊर येथे ॲडमिशन सुरू झालेले आहेत.
आपल्या पाल्यांचे ॲडमिशन घेऊन त्यांच्या भविष्याबाबत निश्चिंत व्हा !
संपर्क:- प्राचार्या सौ.मनिषा पवार ( मो. 7020897049 )
___________________________
Post a Comment