महापुरुषांचे विचार आचरणात आणण्याची गरज - सरपंच लामखडे निंबळक येथे अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

 माय अहमदनगर वेब टीम 




नगर तालुका- महापुरुषांचे विचार आचरणात आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन निंबळक गावच्या सरपंच सौ. प्रियंका लामखडे यांनी केले. निंबळक येथे अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवात साजरी करण्यात आली.
          निंबळक येथे अण्णाभाऊ साठेंची दहा फुटाची आकर्षक मूर्ती उभारण्यात आलेली आहे. या ठिकाणी सकाळी पूजापाद्य करून संध्याकाळी मिरवणूक काढण्यात आली. निंबळक मधील अण्णाभाऊ साठेंचे स्मारक जिल्ह्यातून लोक पाहण्यासाठी येत असतात.  स्मारक स्वर्गीय  स्वर्गीय विलास लामखडे  यांच्या पुढाकाराने बनविण्यात आले असल्याची माहिती सरपंच सौ. लामखडे यांनी दिली. 
          याप्रसंगी  सरपंच प्रियंका अजय लामखडे,  केतन लामखडे,  सोसायटीचे उपाध्यक्ष अविनाश आळंदीकर, ग्रामपंचायत सदस्य राजू रोकडे, बाबासाहेब पगारे,  मालन रोकडे, बापू रोकडे, माऊली रोकडे, अमोल रोकडे, ग्रामविकास अधिकारी सौ. सविता लांडे व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post