शेतकरी विकास पॅनल बाबासाहेब जगताप यांच्या उमेदवारीने मतदारांमध्ये उत्साह काळभैरवनाथ चरणी नारळ फोडून प्रचारात आघाडी

 माय अहमदनगर वेब टीमश्रीगोंदा तालुका -तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने बनपिंप्री गावचे सुपुत्र व प्रगतशील शेतकरी बाबासाहेब जगताप यांना निवडणुकीत उतरविण्यात आले आहे. सुसंस्कृत, तरुण तसेच समाजसेवेची आवड असणाऱ्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात आल्याने मतदारांमध्ये उत्साह वाढल्याचे दिसून येत आहे. 

       चालू वर्षी प्रथमच बाजार समितीत शेतकरी संचालक म्हणून निवडून येणार आहे. त्यामुळे शेतकरी विकास पॅनलच्या वतीने माजी आमदार राहुल जगताप, विधान परिषद सदस्य अरुणकाका जगताप,बाळासाहेब नाहटा, आण्णासाहेब शेलार, दिपक पाटील भोसले, दादासाहेब जगताप, सचिन भाऊ जगताप यांनी शेतकरी प्रतिनिधी म्हणून बाबासाहेब जगताप यांना बाजार समितीची उमेदवारी बहाल केली आहे. बाबासाहेब जगताप यांना मांडवगण गट तसेच तालुक्यातील अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. विविध गावच्या  मतदारांनी बाबासाहेब जगताप यांचे अभिनंदन केले आहे.         बाबासाहेब जगताप यांच्या पाठीशी असलेली तरुणांची फळी तसेच तालुक्यातील दांडगा जनसंपर्क.. धार्मिक ,सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या बाबासाहेब जगताप यांच्या उमेदवारीमुळे शेतकरी विकास पॅनल ला निश्चितच बळकटी मिळणार आहे. बाबासाहेब जगताप यांच्यामध्ये तरुणांचे संघटन कौशल्य तसेच नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे कसब असल्याने तसेच नेहमी सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होत असतात. 

      बाबासाहेब जगताप यांचे तालुक्यातील नाते गोते व मित्रपरिवार याचा निवडणुकीत निश्चितच फायदा होणार आहे. आमदार अरुण काका जगताप, सचिन भाऊ जगताप यांचे कट्टर समर्थक म्हणून बाबासाहेब जगताप यांना ओळखले जाते. राजकारणात निष्कलंक कोरीपाटी म्हणून बाबासाहेब जगताप यांच्याकडे पाहिले जाते. बाबासाहेब जगताप यांनी प्रचाराचा शुभारंभ गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ चरणी नारळ फोडून केला.       यावेळी बोलताना बाबासाहेब जगताप यांनी सांगितले की, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार विजयी होणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार पारदर्शक तसेच शेतकरी व व्यापाऱ्यांच्या हितासाठी विविध निर्णय घेण्यात येतील. माजी आमदार राहुल जगताप, अरुणकाका जगताप, दादासाहेब जगताप, सचिनभाऊ जगताप  तसेच शेतकरी विकास पॅनलच्या सर्वच जेष्ठ नेत्यांच्या  मार्गदर्शनाखाली बाजार समितीच्या विकासासाठी काम करणार असल्याचे बाबासाहेब जगताप यांनी सांगितले.

-------------------------------------------

मांडवगण गट परिसरातील नागरीकांची वज्रमुठमांडवगण गट परिसरातील सर्वच गावातील नागरिकांनी बाबासाहेब जगताप यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला असून गटातील सर्व मतदार बाबासाहेब जगताप यांच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याची माहिती मिळत आहे. शेतकरी विकास पॅनलच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे मतदार सांगत आहेत. एकंदरीत बाबासाहेब जगताप यांच्या विजयाबरोबरच शेतकरी विकास पॅनलच्या सर्वच उमेदवारांना विजयी करण्यासाठी मांडवगण गटातील नागरिकांनी वज्रमुठ बांधली असल्याचे चित्र दिसून येत आहे.

-----------------------------------------

बाबासाहेब जगताप यांच्यासाठी उमेदवारांची माघार

बाबासाहेब जगताप यांना शेतकरी विकास पॅनलने अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यानंतर मांडवगण गट  परिसरातून अनेक इच्छुक उमेदवारांनी भरलेले उमेदवारी अर्ज स्वईच्छेने मागे घेतले आहेत. तसेच त्यांच्याकडून बाबासाहेब जगताप यांच्या पाठीशी व शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारात सक्रिय राहणार असल्याची माहिती ही मिळत आहे.

---------------------------------------------

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post