माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका(शशिकांत पवार)- नगर तालुक्यातील धनगरवाडी येथील यशश्री अकॅडमी अंतर्गत सुरू असलेल्या सावेडी व जेऊर प्री- स्कूलमध्ये नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
यशश्री अकॅडमी स्थापन होऊन वीस वर्ष पूर्ण झाले असून २१ व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. अकॅडमीच्या संचालिका अनुरिता शर्मा, सचिव गणेश शर्मा, यश क्रिएटिव्हचे अध्यक्ष यश शर्मा, सावेडी स्कूल प्राचार्या तानिया वाधवाणी, जेऊर प्री- स्कूलच्या प्राचार्या मनीषा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांच्या सहकार्याने यशश्री अकॅडमीने शिक्षण क्षेत्रात आपला वेगळाच ठसा निर्माण केला आहे.वे
सावेडी प्री-स्कूल येथे प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती प्राचार्या तानिया वाधवाणी यांनी दिली. अकॅडमी अंतर्गत विद्यार्थ्यांना फक्त शिक्षणच नव्हे तर संस्कार, शिस्त, खेळ, आरोग्य तसेच आदर्श जीवन जगताना उपयुक्त ठरेल असे शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना सर्व गुण संपन्न घडविण्याचा शिक्षकांचा नेहमीच प्रयत्न असतो. वर्षभर विविध विद्यार्थी हितासाठी उपक्रम राबविले जातात. त्यामुळे येथील विद्यार्थी शिक्षणाबरोबरच विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवत आहेत.
यशश्री अकॅडमीने शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा निर्माण केला असून पालकांच्या पसंतीस उतरण्याची किमया साधली आहे. त्यासाठी उत्तम व्यवस्थापन, उच्चशिक्षित शिक्षक तसेच प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावणारे कर्मचारी कारणीभूत आहेत. प्रशस्त इमारत, स्वच्छ सुंदर परिसर, विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना ओळखून त्याबाबत प्रोत्साहित करण्याची शिक्षकांमधील कला, शिस्त, एकीची भावना असे विविध वैशिष्ट्य अकॅडमीमध्ये पाहावयास मिळतात. त्यामुळे दूरवरून पालक आपल्या पाल्याला येथे प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न करताना दिसून येतात.
सावेडी प्री- स्कूल मध्ये नूतन वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून पालकांनी आपल्या मुलांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन प्राचार्या तानिया वाधवाणी यांनी केले आहे.
_______________________________
" ग्रीन अँड क्लीन" अकॅडमी
यशश्री अकॅडमी तसेच ॲकॅडमी अंतर्गत असणाऱ्या सावेडी व जेऊर प्री- स्कूलचे वातावरण "ग्रीन अँड क्लीन" आहे. येथे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव येतो. खेळण्यासाठी मैदान तसेच वर्षभर राबविण्यात येणारे नवनवीन अभिनव उपक्रम यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो.
...... अनुरीता शर्मा (संचालिका यशश्री अकॅडमी)
___________________________________
" उज्वल भविष्य" हेच अकॅडमीचे उद्दिष्ट
उच्चशिक्षित शिक्षक अन् नियोजनबद्ध शिक्षण यामुळे यशश्री अकॅडमीने नावलौकिक मिळविला आहे. अकॅडमीचे उत्तम प्रशासन आणि शिक्षक, कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न यातून विद्यार्थ्यांची प्रगती दिसून येते. विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य हेच अकॅडमीचे उद्दिष्ट आहे. चांगले विद्यार्थी घडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहोत. चांगले विद्यार्थी घडल्याने विद्यार्थ्यांबरोबर ॲकॅडमीचे नाव देखील उज्वल होते.
..... यश शर्मा (अध्यक्ष यश क्रिएटिव्ह)
___________________________________
Post a Comment