विद्यार्थिनींना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत जागरूकता आवश्यक- सौ. मनीषा पवार यशश्री प्री-स्कूल जेऊर येथे बालिका दिन साजरा ; विविध उपक्रमांचे आयोजन

 माय अहमदनगर वेब टीम 


नगर तालुका- नगर तालुक्यातील जेऊर येथील यशश्री अकॅडमी संचलित प्री-स्कूल मध्ये मंगळवार दि. २४  जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

     यावेळी 'बेटी बचाव बेटी पढाव' या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बालिका दिन साजरा करण्याची संकल्पना शिक्षिका राजश्री राउल यांनी मांडली. त्यांच्या नियोजनानुसार प्री- स्कूलमध्ये बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.     यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जेऊर प्री- स्कूलच्या प्राचार्या सौ. मनीषा पवार यांनी बालिका दिनाची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. सन २००८ मध्ये महिला व बाल विकास मंत्रालय आणि भारत सरकार यांनी राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यास सुरुवात केली. आज पंधरावा राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात येत आहे. समाजात मुलींना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात येतो. स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी देशाची सूत्र पंतप्रधान म्हणून २४ जानेवारी रोजी स्वीकारली होती. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सौ. पवार यांनी दिली.

     यशश्री अकॅडमीच्या संचालिका सौ. अनुरीता शर्मा, उपप्राचार्या अरूषा कोल्हटकर यांनी सर्व शिक्षकांचे आभार मानून ॲकॅडमी तसेच अकॅडमी संचलित प्री-स्कूलमध्ये विविध अभिनव उपक्रम राबविण्याचे आवाहन अनुरीता शर्मा यांनी केले आहे.

________________________________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post