विद्यार्थ्यांनी कला जोपासणे गरजेचे - अनुरीता शर्मा चित्रकला परीक्षेत यशश्री विद्यार्थ्यांचे यश

 माय अहमदनगर वेब टीम 


 नगर तालुका- राज्य शासनाच्या चित्रकला ग्रेड परीक्षेचा (इंटरमीडिएट व एलिमेंट्री) निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात यशश्री अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकालाच्या परंपरेत सातत्य राखले आहे.

       इंटरमीडिएट या परीक्षेमध्ये अवंती कोंडे, स्वराज लोखंडे, स्वामी साळुंखे, तन्वी कराळे तर एलिमेंटरी या परीक्षेमध्ये मनस्वी नेरकर, मनिज गायकवाड, सक्षम गायधनी, तन्मय चोपडे, ऐश्नी गोरेगावकर, प्रसन्न काकडे, प्राप्ती बोठे या विद्यार्थ्यांनी 'अ' श्रेणी मिळवून विशेष प्राविण्य संपादन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना कलाशिक्षक राहुल लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले.

      यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी बोलताना संचालिका सौ.अनुरीता शर्मा यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी कला जोपासली पाहिजे. कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळत असतो. तसेच वैचारिक दृष्टीला चालना मिळते. कलेचा मानवी जीवनावरील प्रभाव व महत्त्व शर्मा यांनी पटवून दिले.

      सचिव गणेश शर्मा, यश क्रिएटिव्हचे अध्यक्ष यश शर्मा, प्राचार्य सिरील पंडित, उपप्राचार्या अरूषा कोल्हटकर, जेऊर प्री- स्कूलच्या प्राचार्या सौ. मनीषा पवार, क्रीडा मार्गदर्शक राजेंद्र पवार यांनी यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

_____________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post