यशश्री विद्यालयाच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावतोय- प्रा. पवार क्रीडा सप्ताहाचा उद्घाटन समारंभ संपन्न ; विविध उपक्रमांचे आयोजन

 माय अहमदनगर वेब टीमनगर तालुका (शशिकांत पवार)- नगर तालुक्यातील धनगरवाडी येथील यशश्री अकॅडमी विद्यालयाच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असल्याचे प्रतिपादन प्राध्यापक राजेंद्र पवार यांनी केले आहे. विद्यालयामध्ये क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन गुरुवार दि. १५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले.

    यशश्री अकॅडमी येथे क्रीडा स्पर्धा आणि क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे उद्घाटन आदर्श क्रीडा प्रशिक्षक पुरस्कार प्राप्त आणि रिसोर्स पर्सन म्हणून मान्यता प्राप्त प्रशिक्षक केशव रासकर यांच्या हस्ते विद्यालयाच्या संचालिका सौ. अनुरीता शर्मा, सचिव गणेश शर्मा, यश क्रिएटिव्ह एज्युकेशनचे उपाध्यक्ष यश शर्मा, प्राचार्य सिरील पंडित, उपप्राचार्या आरुषा कोल्हटकर, जेऊर प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. मनिषा पवार विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक राजेंद्र पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

     यावेळी बोलताना प्राध्यापक राजेंद्र पवार यांनी यशश्री विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच यशश्री विद्यालयाचा प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असल्याचे सांगितले.

       कार्यक्रमाची सुरुवात क्रीडा ध्वजारोहण करून करण्यात आली. यावेळी क्रीडा कप्तान आणि उपकप्तान यांनी खिलाडू वृत्ती जपण्याची शपथ ग्रहण केली. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी झुंबा नृत्य सादर केले. तसेच तायक्वांदो या क्रीडा प्रकाराचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सादर केले.

     कार्यक्रमाचे अध्यक्ष केशव रासकर यांनी वैयक्तिक- सांघिक क्रीडा स्पर्धांमधून विविध स्तरांवर पुढे जात असताना विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास घडुन येतो. सहनशीलता, खिलाडू वृत्ती, शिस्त, आदर या मूल्यांची जोपासना केली जाते. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिरिक्त वापर टाळून क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव उज्वल करावे असे आवाहन केले.

      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा प्रशिक्षक राजेंद्र पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी  शिक्षक ऋषिकेश घोडेकर, सायली कांबळे, विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आभार प्रदर्शन विद्यार्थिनी चारू नवलानी हिने तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समर्थ कुसळकर, अवंती कोंडे, सदफ सय्यद यांनी केले.

_______________________________________________

यशश्री विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर मैदानी खेळाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मैदानी खेळामुळे आरोग्य सुदृढ राहते. विद्यार्थी मोबाईल मध्ये गुरफटत चाललेले आहेत त्याबाबत पालकांनी ही काळजी घेण्याची गरज आहे.

..... प्रा. राजेंद्र पवार

___________________________________________________

पंचक्रोशीत यशश्री विद्यालयाचा नावलौकिक

धनगरवाडी येथील यशश्री विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचा अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध उपक्रम राबविले जात असतात. विद्यार्थ्यांची गुणवत्ता तसेच विद्यालयाचे विद्यार्थी खेळातही प्राविण्य मिळवत आहेत. त्यामुळे यशश्री विद्यालयातील शिक्षकांचे जेऊर, धनगरवाडी, बहिरवाडी, ससेवाडी, इमामपूर, पांढरीपुल, खोसपुरी, नगर, मिरी पंचक्रोशीतील ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.

______________________________________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post