मदडगावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन अटळ! सरपंच पदाचे उमेदवार साहेबराव शेडाळे यांचा विजय निश्चित?श्री पांडुरंग कृपा ग्रामविकास पॅनलचा होणार एकतर्फी विजय!

-साहेबराव शेडाळे यांची निवडणुक गावकऱ्यांनीच घेतली हाती

माय अहमदनगर वेब टीम

-नगर तालुक्यातील मदडगाव येथील ग्रामपचायत निवडणुकीत श्री पांडुरंग कृपा ग्रामविकास पॅनलचा एकतर्फी विजय होण्याची दाट चिन्हे आहेत. सरपंच पदाचे उमेदवार साहेबराव छबूराव शेडाळे यांनी तर प्रचारात आघाडी घेतली आहे. सुरू असलेल्या निवडणुकीत गावातील माजी सरपंच- चेअरमन, भजनी मंडळसह तरुणांनी साहेबराव शेडाळे त्यांच्या पॅनलच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला. या पॅनलच्या चंद्रकला आजिनाथ आठरे  बिनिरोध झाल्या आहेत. त्रिदल संघटना महाराष्ट्र राज्य व गावातील सर्व  वकिलांनी सुद्धा पॅनलला पाठिंबा दिल्याने  उमेदवारांचा विजय सुकर होणार आहे. 


मुरलीधर रेवणाथ गायवळ, अक्षय आसाराम सुंबे, मंगल मुक्तराम ढवळे, जना राजू शेडाळे, लविना संतोष कांबळे हे सगळे उमेदवार विजयाच्या मार्गावर आहेत.

गावात 10 वर्ष ज्यांची सत्ता होती त्यांनी विकास कामे केली नसल्याचा सुर आहे. त्यामुळे जनतेला परिवर्तन आपेक्षित आहे. मुळातच श्री पांडरंग कृपा ग्रामविकास पॅनल विजय निश्चित मानला जात आहे. साहेबराव शेडाळे यांच्या पॅनलचे उमेदवारही तगडे असून त्यांचा नेहमी गावाच्या विकासात मोलाचा वाटा असतो. एक वर्षांपूर्वी झालेल्या सोसायटी च्या निवडणुकीत ही यांनी विरोधकांना पराभूत केले होते. तिथेही गावातील जनतेने परिवर्तन केले आणि आताही परिवर्तन अटळ आहे. अनेक वर्षापासून साहेबराव शेतकऱ्यांसाठी अहोरात्र झटनारे साहेबराव शेडाळे यांनी अनेक सामाजिक उपक्रमही राबविले आहेत. धार्मिक कामात नेहमीच अग्रेसर असतात. सर्वसामन्यांसाठी नेहमीच मदतीचा हात त्यांचा असतो. त्यांना सरपंच पदाच्या निवडणकीत मोठी सहानुभूती मिळाली असून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली असून विजयी होण्याचे सगळे मार्ग मोकळे झाले असल्याचे बोलले जात आहे. 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post