गुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक

 


---------------------------------------

 नगर तालुका : अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या गुंडेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या सभागृह बांधकामासाठी सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांनी पाच लाख रुपयांची मदत दिली असून त्याचा धनादेश जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे सचिव जी.डी.खानदेशी यांच्या कडे सुपुर्द केला. यावेळी न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगरचे प्राचार्य भास्कर झावरे, विश्वस्त मुकेश मुळे, प्रमोद पवार, तुषार जाधव, गुंड सर तसेच गुंडेगाव येथील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर गावातील नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

      यावेळी संस्थेचे सचिव खानदेशी यांनी सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांच्या कार्याचे कौतुक करुन शिंदे यांचा संस्थेच्या वतीने सत्कार केला. पुढील वर्षी जानेवारी २०२३ मध्ये शिक्षण,सामाजिक,राजकीय, कला,मंत्री यांच्या सह अनेक  दिग्गज मान्यवर गुंडेगावात  सभागृह बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेला ग्रामीण भागात शैक्षणिक मदत ही इतिहासात मोठी मदत करणारे भाऊसाहेब शिंदे असल्याचे संस्थेचे सचिव जी.डी.खानदेशी साहेब यांनी सांगितले.

      यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी ग्रामीण भागात सर्व सोयी सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच आजच्या काळात विद्यार्थी हे मैदानी खेळ विसरत चालले असून मोबाईल मध्ये गुरफटत आहेत अशी खंतही शिंदे यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खेळाकडे ही लक्ष देण्याचे आवाहन शिंदे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.

___________________________

 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच विविध गुणात्मक उपक्रमांचा लाभ व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळावे. यासाठी शाळेला सभागृह सभामंडप असावा हीच माझी सामाजिक कार्यकर्ते म्हणून शाळेला मदत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी सोयी सुविधांचा अभाव असताना देखील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.

....भाऊसाहेब शिंदे. ( सामाजिक कार्यकर्ते )

_____________________________________

शिंदे यांच्या कार्याचे कौतुक 

भाऊसाहेब शिंदे हे नेहमीच सामाजिक, धार्मिक ,शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेत असतात. त्यांच्या या निस्वार्थी समाजसेवेबद्दल पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांकडून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

_______________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post