माय नगर वेब टीम
नाशिक - राज्यात किमान आणि कमाल तापमानात सरासरीपेक्षा दोन ते तीन अंशाने घसरण झाली असून सोमवारी राज्यातील नीचांकी १२.८ तापमान नाशकात नोंदवले गेले.
त्याखालोखाल पुणे येथे १३.२ तर औरंगाबादेत १३.९ तापमान नोंदवले गेले. सध्या बंगालच्या उपसागरात श्रीलंकेजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून ते तामिळनाडूकडे येण्याची शक्यता आहे. ते येताना तीव्र हाेऊ शकते. तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून त्या परिसरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे.
राज्यातील शहरांतील किमान तापमान
नाशिक १२.८ अंश
पुणे १३.२
औरंगाबाद १३.९
अहमदनगर १४.१
बारामती १४.१
जळगाव १४.५
जालना १५.०
परभणी १५.४
सातारा १५.५
महाबळेश्वर १५.६ अंश
Post a Comment